Loksabha Election 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांचा धडाका आजपासून महाराष्ट्रात सुरु होत असून पुढील 2 दिवसांमध्ये पंतप्रधान राज्यात तब्बल 6 मतदरासंघांमध्ये सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दिवसभरातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत...
29 Apr 2024, 20:12 वाजता
नाव न घेता नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका
महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, अशी टीका मोदींनी केली आहे.
29 Apr 2024, 17:54 वाजता
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता समीकरणं बदलत चालली आहेत. एकीकडे सुजय विखे पाटील आणि दुसरीकडे निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत असताना आता निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमआयएमचे उमेदवार परवेज अशरफी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला अन् नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय. मुस्लिम समाजातून होत असलेल्या विरोधामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
29 Apr 2024, 15:50 वाजता
ओबीसींसाठी नगरमध्ये बॅनर! मफलर घातलेला नेत्याचा फोटो; पोस्टर हटवले
Ahmednagar | OBC Banner Removed | ओबीसींसाठी नगरमध्ये बॅनर! मफलर घातलेला नेत्याचा फोटो; पोस्टर हटवले#OBC #loksabhaelection2024 #ahmednagar pic.twitter.com/LTsSo7s52C
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 29, 2024
29 Apr 2024, 15:12 वाजता
अमोल कीर्तिकरांविरोधात रविंद्र वायकर लढणार - सूत्र
Ravindra Waikar Mumbai North West Candidate | अमोल कीर्तिकरांविरोधात रविंद्र वायकर लढणार - सूत्र#Amolkirtikar #ravindrawaikar #shivsena #Shindecamp #Thackeraycamp pic.twitter.com/mAce91RdTa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 29, 2024
29 Apr 2024, 14:24 वाजता
विकासाच्या गॅरंटीवर मत मागायला आलोय; मोदींचं सोलापूरकरांना आवाहन
2024 मध्ये दोनदा सोलापूरमध्ये आलो, म्हणत पंतप्रधान मोदींनी सोलापूरमधील सभेच्या भाषणाला केली सुरुवात. मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. मी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. जानेवारी महिन्यात मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो. आज मी विकासाच्या गॅरंटीवर मत मागतोय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
29 Apr 2024, 13:05 वाजता
नाशिकमधून शिंदे गटाचं धक्कातंत्र! शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज
नाशिकमधून कोणाला उमेदवारी दिली जाणार यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम लागला आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये बाबांचा मोठा अनुयायी वर्ग आहे.
29 Apr 2024, 12:56 वाजता
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धीविनायकाचं दर्शन
उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी सिद्धीविनायकांचे घेतले दर्शन. यावेळेस अनिल देसाईही त्यांच्याबरोबर होते.
Loksabha Election 2024 | Anil Desai आणि Arvind Sawant यांनी सिद्धीविनायकांचे घेतले दर्शन#anildesai #arvaindsawant #loksabhaelection2024 pic.twitter.com/zYSfNd9kC1
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 29, 2024
29 Apr 2024, 11:44 वाजता
'राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं...'; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान
काँग्रेसने लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्द्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अविवाहित असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकूर यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. येथे क्लिक करुन वाचा ठाकूर नेमकं काय म्हणाले
29 Apr 2024, 10:45 वाजता
उद्धव ठाकरेंची प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सभा
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी सात वाजता कर्णिक नगर ग्राउंड इथे ही जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत.
29 Apr 2024, 09:34 वाजता
मुंबईत शेवाळे भरणार अर्ज; सीएम राहणार उपस्थित
मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यावेळी उपस्थित राहणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अनिल देसाईही आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फोर्टच्या बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापासून ते रॅली काढणार आहेत.